राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऊजनी लघु वितरिका दुरुस्तीबाबत निवेदन
पंढरपूर (एस एम पोरे )- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उजनी उजवा कालव्याच्या लघु वितरीका क्रमांक 24(अ) मध्ये सध्याच्या परिस्थितीत झाडे झुडपे वाढलेली आहेत ती साफ करावीत व दाराच्या गळत्या बंद करण्यासाठी दारे दुरुस्त करावीत अशी मागणी कार्यकारी अभियंता , पंढरपूर विभाग यांना प्रदेश सचिव अरुण आसबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी ८दिवसात साफ सफाई व दारे दुरुस्ती चे काम चालू करून घेऊ असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आणि लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. हे काम पूर्ण झाल्यास टेलला असणारी गावे या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत व पाण्याचा अपव्यय होणार नाही.याचा लाभ उपरी,भंडीशेगावं,शेळवे, खेडभाळवणी यासह इतर गावांना होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे, राकेश साळुंखे, राहुल गाजरे, Rushi मोरे यांच्यासह पक्षाचे इतर कार्यकर्ते , शेतकरीवर्ग ऊपस्थित होते.