डाॅक्टर व परिचारिकांना “फेस शिल्ड” चे वितरण ..
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर येथील प्रा. भास्कर गटकूळ व प्राध्यापिका जयश्री गटकूळ यांचा मुलगा पृथ्वीराज यांनी कोरोना युध्दातही त्याने स्वतः फेस शिल्ड ची निर्मीती करुन “जागतिक परिचारिका दिनी” इंदापूर शहरातील १०० डाॅक्टर व परिचारिकांना या फेस शिल्ड चे मोफत वितरण केले आहे
पृथ्वीराज हा कुशाग्र बुद्धीचा आहे या लाॅकडाऊन मध्ये ही त्याने स्वतःच्या बुध्दीतून अतिशय सुंदर अशी फेस शिल्ड ची निर्मीती केली. त्याशिवाय अत्याधुनिक असे पी.पी.ई.किट ची निर्मिती पृथ्वीराज याने केली असून यात दोन इलेक्ट्रॉनिक्स् पंखे व एन-९५ फिल्टर ची विशेष सोय करण्यात आली आहे.महत्वाची बाब म्हणजे या पी.पी.ई. किट मध्ये किट परिधान केलेली व्यक्ती हवे तेव्हा पाणी पिऊ शकते अशी प्रणाली साकारण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर चार पी.पी.ई. किट ची निर्मिती केली असून त्याला हॅपकिंन्स् इनस्टिट्यूट आणि सिट्रा या दोन संस्थांची मान्यता मिळवण्यासाठी सदर संस्थांकडे चाचणी साठी पाठवणार असल्याचे पृथ्वीराज याने सांगितले आहे.
पेट-जी प्लॅस्टीक, हिटलाॅन फोम,वेल क्रो आदी वस्तू वापरून उत्तम अशा फेस शील्डची निर्मिती पृथ्वीराज व त्याच्या टीमने केली. तयार फेस शील्ड इंदापुर मधील विविध रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, इंदापुर पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्र सेवा दलाचे सदस्य यांना मोफत वाटप केले. शिवाय आता या फेस शील्ड च्या “ना नफा – ना तोटा” तत्वावर इतरत्र पुरवठा करण्यासाठी इंदापुर मधील शौर्य प्रतिष्ठानची टीम पुढे सरसावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व इंदापूर सारख्या शहरात नागरिकांना अत्यल्प दरात हे फेस शील्प उपलब्ध होणार आहेत.
पृथ्वीराजने पुणे येथील एम.आय.टी.काॅलेजात पाॅलिमर इंजनिअर चे शिक्षण घेतले आहे.मागील कालावधीत २०१३ साली डी.डी.नॅशनल कडून आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल रोबोकाॅन स्पर्धेमध्ये भरताचे प्रतिनिधित्व केले आहे. कार्बन फायबर, ड्रोन कॅमेरा,आॅटोमेशन आणि कँम्प्यूटर व्हिजनचे प्रोजेक्ट्स असे विविध प्रकल्प राबवण्यात पृथ्विराज व त्याची टीम यशस्वी ठरली आहे. भविष्यात भारताला टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये स्वावलंबी करणे व पर्यावरण पूरक असे विविध नाविण्य प्रकल्पाची निर्मिती करुन भारताची नवी ओळख निर्माण करण्याचा पृथ्वीराज व त्याच्या टीमचे स्वप्न आहे.






