पांढऱ्या पट्याला सुजलाम, सुफलाम करणाऱ्या हरितक्रांतीच्या देवदूताला साथ द्या . – सौ. अरुंधती संजय घाटगे.
केनवडे (ता कागल) : सुभाष भोसले
महायुतीचे उमेदवार मा.संजयबाबा घाटगे यांच्या प्रचारार्थ गोकुळच्या माजी संचालिका सौ. अरुंधती संजय घाटगे यांनी केनवडे येथे गावकऱ्यांशी संवाद साधला. गोरंबे, केनवडे, साके, व्हनाळी, सावर्डे या पांढर पट्याला कायम स्वरूपी सुजलाम, सुफलाम करणाऱ्या हरितक्रांतीच्या देवदूताला साथ द्या तसेच अन्नपूर्णा शुगरच्या माध्यमातून गावच्या प्रगतीला हातभार लावण्याचे आवाहन यावेळी केले.
सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी ज्यांनी आयुष्य घालवले, काही न घेता फक्त समाजाला देण्याचे काम केले त्यांना एकवेळ साथ देवून स्वर्गीय सदाशीवरावजी मंडलिक यांचे स्वप्न करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असुन ती जबाबदारी आपण या निवडणुकीत पार पाडून मंडलिक साहेबांचे स्वप्न पुर्ण करूया असे आवाहन त्यांनी केले.






