तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मदतीसाठी पाठपुरावा करणार – आमदार मंगेश चव्हाण
खडकी बु.परिसरातील नुकसानीची केली पाहणी
तात्काळ सरसकट पंचनामे व जलद मदत प्रक्रिया राबविण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना
मनोज भोसले
गेल्या ७ ते ८ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने खूप मोठे अस्मानी संकट उभे राहीले आहे.
ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही इतक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तरी या भयावह परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असून याबाबत कालच नामदार गिरिषभाऊ महाजन व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. पिक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ विमा क्लेमबाबत जिल्हाधिकार्यांना विनंती केली.
जिल्हाधिकारी यांनीदेखील संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच होणाऱ्या अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. त्यांनी नुकतीच खडकी बु परिसरातील अवकाळी पावसामुळे शेतीमालाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष के.बी.साळुंखे,
प.स. सभापती दिनेश बोरसे,
कृ.उ.बा. सदस्या अलकनंदा भवर
भाजपा तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे,
मंडळ अधिकारी डी आर मोरे,
कृषि विभागाचे मंडळ अधिकारी जे व्ही पाटील, कृषी सहाय्यक सुजाता सरदार
खडकी येथील महादु पागे,
रतन कोल्हे, कौतिक मांडोळे ,
संजय मांडोळे, शरद पाटील, अशोक पाटील, नाना तांबे, बापु डोखे, पुंडलिक जगताप, रामभाऊ मांडोळे, वाल्मिक धनगर, दत्तु डोखे, शिवाजी मांडोळे, हिलाल वाघमोडे , मुरलीधर तांबोळे आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या तसेच मदत देण्याकरिता जी काही प्रशासकीय प्रक्रिया असते ती जलदगतीने राबविण्याच्या सूचना दिल्यात.






