Chalisgaon

राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोरोना विरोधातील लढाईसाठी लोकसहभाग महत्वाचा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोरोना विरोधातील लढाईसाठी लोकसहभाग महत्वाचा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नूरखान

चाळीसगाव येथे लोकसहभागातून उभे राहिलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
चाळीसगाव येथील कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालय राज्यात मॉडेल करण्याचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण कोविड सेंटरसाठी मदत करणाऱ्या दात्यांचा गौरव
चाळीसगाव – कोरोना हा आजार काही जात – पात – पक्ष – धर्म पाहून येत नाही. त्यामुळे आज जो जगेल तो उद्या राज्य करेल. चाळीसगाव हे दात्यांचे गाव आहे. चांगल्या कामात लोकसहभाग आला तर त्याची उंची देखील वाढते. कोरोना विरोधातील लढाईसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने व सर्वपक्षीय लोकसहभागातून उद्घाटन झालेले कोविड केअर सेंटर कौतुकास्पद असून ही वेळ राजकारणाची नसून माणसाला वाचविण्याची आहे त्यामुळे कोविड व त्या अनुषंगाने असलेल्या कामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते चाळीसगाव येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, तहसिलदार अमोल्र मोरे, वैद्यकीय डॉ.बी.पी.बाविस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शिवसेना तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, उमंग परिवाराच्या सौ.संपदा पाटील, PWD चे उपअभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोविड केअर सेंटरविषयी माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी चाळीसगाव तालुक्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु व्हावे यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक पक्ष संघटनानी पुढे येत मदत जाहीर केली. चाळीसगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्याठिकाणी शब्द दिला की ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासेल त्याठिकाणी मी उभा राहील आणि आज दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद असून चाळीसगावतील अनेक दात्यांच्या मदतीने राज्यातील सुसज्ज असे कोविड सेन्टर येथे लोकसहभागातून उभारले गेले आहे. लोकप्रतिनिधी, आधिकारी व समाजसेवकांच्या समन्यवयाचे हे राज्यातील आदर्श उदाहरण आहे. खाजगी रुग्णालयापेक्षाही चांगल्या दर्जाचे कोविड सेन्टर उभारले गेल्याने मी चाळीसगावातील सर्व दात्यांचे मनापासून आभार मानतो अशी भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.

निधी नसतांनाही अल्प कालावधीत उभी राहिली ग्रामीण रुग्णालयाची इमारत

ग्रामीण रुग्णालय उभारणीबाबत आलेल्या अडचणी सांगताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अपूर्ण होते. कोरोना मुळे निधीला अडचण येणार होती. त्याबाबत सबंधित ठेकेदारांना मी व खासदार महोदयांनी विश्वास दिला की आज आणीबाणीची परिस्थिती आहे. तुम्ही काम पूर्ण करा, आम्ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ. त्यांनीदेखील पदरमोड करत हे पुण्याचे काम आहे म्हणत अल्प कालावधीत खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशी इमारत उभी केली. अंदाजपत्रकाच्या व्यतिरिक्त त्यांनी डांबरी रस्ते एवजी सर्व रस्ते सिमेंट चे बनविले, वाल कंपाऊंड, दुसऱ्या मजल्यासाठी टावर, गटारी बांधकाम केल्या. तसेच अंदाजपत्रकात आतील भिंतीला 3 फुटापर्यंतच फरची (टाइल्स) होती ती वाढवून ६ फुटापर्यंत करण्यात आली त्यामुळे भिंती स्वच्छ करणे सोयीचे होणार आहे. याबरोबरच अंदाजपत्रकातील साध्या POP एवजी निर्जंतुकीकरणासाठी जॉइंटलेस POP आदी ५० लाखांची अतिरिक्त कामे करून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.

येणाऱ्या काळात देखील ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता राहावी यासाठी खाजगी एजन्सी नेमून देखभाल केली जाईल. सर्वांच्या सहकार्याने राज्यात एक मॉडेल कोविड सेंटर उभारण्याचा आमचा मानस आहे असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या महसूल व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले. तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, शासन स्तरावर अनेक तालुका विकासाचे प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यांना तात्काळ मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच आमदार निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिकाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असून तो ताबडतोब मंजूर करावा व कोविड रुग्णांच्या देखभालीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदे भरण्यात यावीत. चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात यावी. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने तालुक्याच्या विकासासाठी गुलाबरावजी पाटील साहेबांनी सहकार्य करावे अशी विनंती आमदार चव्हाण यांनी केली.

खासदार उन्मेष पाटील उपस्थित नसल्याने त्यांच्यावतीने सौ.संपदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय इमारतीचे ठेकदार विवेक पानसरे, तालुक्यातील कोविड रुग्णांचे मानसिक सामोपदेशन करणारे रणजीत गव्हाळे यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

यांच्या दातृत्वातून उभे राहिले कोविड केअर सेंटर

आमदार मंगेशदादा चव्हाण व भाजपा, चाळीसगाव –

५० बेडसाठी ऑक्सिजन यंत्रणा,
१ वाशिंग मशीन,
६ एलईडी स्मार्ट टीव्ही,
म्युझिक सिस्टम,
५० बेड
500 बेडशीट
सर्व खिडक्यांना पडदे
संपूर्ण परिसर व बाथरूम ला मॅट
48 सीसीटीव्ही कॅमेरे
१० बाथरूम साठी सोलर वाटर हिटर सिस्टम
वाशिंग मशीन
एअरटेल डीश टीव्ही 5
3 हायमास्ट लाईट
50 बकेट, 25 मग, 1 सफाई मशीन

तसेच आमदार निधीतून – ३० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका व ५ लाखांची ऑटोलाईन

जी.एम.फाउंडेशन (गिरीषभाऊ महाजन) – २ व्हेंटीलेटर

प्रविणभाई पटेल –
१० मॉनिटर (multipara)
२० गाद्या,
२० उश्या,
२० बेडशीट

अंबुजा कंपनी – १० मॉनिटर, १० बेड, २ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
संतोष शर्मा – बेडसाईड लॉकर ५०
स्व.गोल्डी महाले यांच्या स्मरणार्थ बालाजी हॉस्पिटल तर्फे – १० फ्लो ऑक्सिमिटर
महावितरण कंपनी – ४ बेड
शिवसेना – ३ बेड
R O वाटर प्युरीफायर – राष्ट्रवादी काँग्रेस 1 व प्रवीण छाजेड (पंकज एजन्सी) 1
स्वस्त धान्य व रेशन दुकानदार – २ बेड
भोजराज पुंशी – ८ बेड
संदीपभाऊ बेदमुथा – ४ बेड

आर्थिक स्वरुपात मदत –

कच्छ कडवा पाटीदार समाज – २५ हजार रुपये
जयंत भिकन गायकवाड (वीज वितरण कर्मचारी ) – ५ हजार रुपये
श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी – ५ हजार रुपये
नूतन तहसिलदार पदी निवड झालेले राहुल मोरे – ५ हजार रुपये

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button