कोरोना चा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: कोरोना चा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली इंदापूर तहसील कार्यालय येथे तालुक्यातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी इंदापूर च्या तहसीलदार सोनाली मेटकरी , गटविकास अधिकारी विजयकुमार परीट , इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर , वालचंदनगर व भिगवण चे सहाय्यक पोलिस निरीक्षक , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ , उपजिल्हा रुग्णालय अधिकारी राजेश मोरे , कृषी अधिकारी सूर्यभान जाधव , इंदापूर नगरपालिका कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार ठेंगल , महावितरण चे अधिकारी गोफणे साहेब , त्याचबरोबर सर्व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंदापूर च्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी इंदापूर तालुक्यामध्ये प्रदेशातून आलेल्या 37 नागरिक व तालुक्यात एकूण पुणे व मुंबई या भागातून 6000 नागरिक आले आहे त्यांची तपासणी योग्य पद्धतीने चालू असल्याचे सांगितले त्याचबरोबर तालुक्यातील सर्व गावांना रेशन दुकानाच्या माध्यमातून अन्नधान्याचा तुटवडा पडू देणार नसल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी सांगितले की इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून 115 ग्रामपंचायतीने गावामध्ये जंतूनाशक औषध फवारणी केल्याचे सांगितले गावातील पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील व तलाठी ग्रामसेवक गावातील दक्षता समिती यांच्या माध्यमातून दक्षता घेतली जात आहे.
यावेळी बोलताना नारायण सारंगकर यांनी सांगितले इंदापूर शहर व परिसरात गावांमध्ये यासंदर्भात दक्षता घेतली जात असून प्रत्येक किराणा दुकानदारांना परवाना दिल्याचे त्यांनी सांगितले तसेच शहरातील जीवनावश्यक वस्तू किराणा दुकाने तसेच परिसरामध्ये योग्य ती काळजी घेतली जात आहे. याकाळात अवैध धंदा करणाऱ्याला चोरून दारू विकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सारंगकर यांनी सांगितले. यावेळी भिगवण येथे रोटरी क्लबच्या वतीने मच्छीमारी करणाऱ्या व्यवसायिकांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येत आहे यांचे कौतुक महाराष्ट्राचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले तसेच काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची कौतुक केले. काही दिवस विशेष काळजी घेण्याची सूचना केल्या त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त व्यक्ती सापडू नये यांची काळजी घ्यावी असे आवाहन केले , नागरिकांनी सर्व अधिकारी वर्ग स्वतःची काळजी घ्यावी . इंदापूर तालुक्यातील बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचे काम तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये एकूण ग्रामीण भागांमध्ये 69000 कुटुंबे असून इंदापूर शहर मध्ये एकूण सहा हजार कुटुंबे आहेत या सर्व कुटुंबाचा सर्वे केला असून असून इंदापूर तालुक्यात विशेष काळजी घेतली जात आहे एकूण 800 बेड ची सोय केली असून त्यामध्ये इंदापूर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यामध्ये पन्नास बेड ची सोय करण्यात आली आहे , तसेच समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये २०० बेड तर ३० बेड शासकीय सोय करण्यात आली आहे , तालुक्यांमध्ये आणखी गरज पडल्यास रुग्णांसाठी बेड वाढवले जाणार असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
चुकीची माहिती देणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश मोरे गडबडले.
“राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कोणतेही भरीव काम न करता चुकीची माहिती वाचून दाखवताना माहिती चुकीची असल्यामुळे अक्षरशा गडबडले. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने इंदापूर शहरातील नागरिकांची तपासणी मोहीम सुरू आहे.यामध्ये जवळपास बत्तीस हजार लोकांची तपासणी केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश मोरे यांनी दिली.परंतु शहराची लोकसंख्या 32,000 हजार नसल्याने मीटिंगमध्ये हशा उडाला.त्यामुळे चुकीची माहिती सांगून वैद्यकीय अधीक्षक मोरे पुरते गडबडले दिसत होते.त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने खबरदारी साठी सुसज्ज यंत्रणा राबवावी असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.”






