Pune

पदवीधर युवकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी – एस.के चव्हाण सर नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च

पदवीधर युवकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी – एस.के चव्हाण सर

नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च

प्रतिनिधी रफिक आतार

पुणे पदवीधर युवकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी एस.के.चव्हाण यांनी दैनिक लोक प्रधान सी बोलताना म्हणाले जुलै महिन्यात होणार्या पुणे पदवीधर मतदार संघ पुणे या संघात होणार्या मतदानासाठी आजच आपले नाव नोंदणी करावी व घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजावावा योग्य तो आमदार निवडून द्यावा असे आव्हान श्री एस के चव्हाण सर यांनी केले

पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार या मतदारसंघातील उमेदवार कोण? याची चर्चा रंगलेली असतानाच सर्व पक्षांनी या मतदारसंघात कंबर कसण्यास सुरू केली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर असे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे.तरी याकडे मात्र मात्र नव्या मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादी अपडेट करण्यासाठी online पद्धतीने नव्याने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या मतदारसंघात गतवेळी सुमारे चार लाखांच्या आसपास नोंदणी होती. सध्या मतदारसंघात अधिक पदवीधर आहआहे
मात्र नव्या मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरविल्यामुळे मतदार नोंदणी अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची प्रक्रिया किचकट बनविल्यामुळे नोंदणी करण्यासाठी पदवीधरच अनुत्सुक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी केली असली तरी नोंदणी होण्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.पुणे जिल्हा पदवीधर मतदारसंघासाठी जुलै महिन्यात पदवीधर मतदारांची निवडणूक होणार आहे.

??ऑनलाईन नोंदणी कशी करायची…?

पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा
खालील लिंकवरील पूर्ण फाॅर्म भरून आपला फोटो, पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा अपलोड करा.

पत्यामधे पिन कोड न चुकता भरावा आपला मोबाईल नंबर बिनचुक भरा
?? 2016 किंवा त्या पुर्वी पदविका किंवा पदवी उत्तिर्ण होणे आवश्याक आहे नाव नोंदणी करण्यासाठी

??लिंक…
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
*मतदारांचे नाव शोधाण्यासाठी ..

??लिंक..
https://cebo.maharashtra.gov.in/gtsearch1/

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button