राज्यातून येणाऱ्या व्यक्तीस 48 तास आधी RTPCR चाचणी करणे बंधनकारक
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ब्रेक द चैन’ आदेश कालावधी 15 मे रोजी सकाळी 7.00 वाजेपासून 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7.00 वाजेपर्यत मुदतवाढ दिलेली आहे. या आदेशातील नमूद सर्व बाबी व खालील बाबी ह्या संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.
इतर राज्यातून औरंगाबाद जिल्हा व शहर परिसरात कोणत्याही प्रवासी माध्यमातून येणा-या व्यक्तीस 48 तास आधी RTPCR चाचणी करणे बंधनकारक राहिल. 18 एप्रिल व 01 मे मधील शासन आदेशातील बंधने राज्याच्या व देशाच्या कोणत्याही भागातून औरंगाबाद जिल्हयात येणा-या व्यक्तीस लागू राहतील.
मालवाहू सेवांचे बाबतीत 02 पेक्षा अधिक व्यक्तींना (ड्रायव्हर + स्वच्छ / मदतनीस) प्रवासाची मुभा असणार नाही. ग्रामीण भागातील बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विशेष निगराणी ठेवावी आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अडथळा येत असेल तर बंद करावे.
दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया उद्योगास निर्धारित करुन दिलेल्या अटी शर्ती, नुसार पूर्ण वेळ संचलनाची मुभा राहिल. मात्र किरकोळ विक्री व घरपोच सेवा तसेच दुकानातील विक्रीसकाळी 07.00 ते 11.00 वाजेपर्यंतच सुरू. विमानतळ सेवांमध्ये कार्यरत असलेले आणि कोविड-19 उपचार संबंधी आवश्यक औषधांशी संबंधीत वस्तु/उपकरणे यांच्या वाहतुकीशी निगडीत कर्मचा-यांना Local, Metro, Mono मध्ये प्रवास करण्याची परवानगी राहिल.






