Amalner

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत,संविधान, लोकशाही याविषयावर जाहीर सभा

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत,संविधान, लोकशाही याविषयावर जाहीर सभा

अमळनेर येथिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथें आयोजित जाहीर सभेसाठी राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते व राजकिय विश्लेषण योगेंद्र यादव ,विद्यार्थी नेता,वक्ता उमर खालिद ,गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी हे अमळनेरला ८ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता येत आहे.लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत,संविधान, लोकशाही याविषयावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत,संविधान, लोकशाही याविषयावर जाहीर सभाअमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून1. जागतिक कीर्तीचे राजनीतिक विश्लेषक, लेखक, वक्ते , राजकीय विचारवंत व कृषी चळवळीचे मार्गदर्शक प्रा. योगेंद्र यादव सभेला संबोधित करतील तर शोषितांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवक चळवळीचे राष्ट्रीय नेते, फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध वक्ते गुजरात विधानसभेचे आमदार मा. जिग्नेश मेवानी तसेच विद्यार्थी चळवळीचे युवा नेतृत्व, भगतसिंग-आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते उमर खालिद हे ही मार्गदर्शन करणार आहेत.

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने भारत,संविधान, लोकशाही याविषयावर जाहीर सभाकार्यक्रमाचे अध्यक्ष आ.अनिल भाईदास पाटिल हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल,नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटिल ,लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई पाटिल, जळगांव येथील करीम सालार सर हे उपस्थित राहणार आहे.
अमळनेर मधील देशप्रेमी, संविधान प्रेमी युवक,नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकशाही बचाव नागरी कृती समिती,अमळनेरच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button