Amalner

?️ हात मजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांचे काटे फेकणारे अधिकारी आज दारू वाल्यांच्या बॉटल फोडतील का?

?️ हात मजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांचे काटे फेकणारे अधिकारी आज दारू वाल्यांच्या बॉटल फोडतील का?

अमळनेर

शहरात दि 22 मार्च पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फळ भाजी विक्रेते यांना अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली आहे. सर्व हात मजुरी करणारे लहान लहान लोट गाडी धारक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस भर उन्हात थांबून दोन पैसे मिळवीत आहे तेही प्रामाणिक पणे एक no चा व्यवसाय करून.परंतु अमळनेर ला लाभलेल्या मेरी मर्जी प्रमाणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत ह्या हात मजूर लोकांची अनेक वेळा रोजी रोटी असलेले साधन म्हणजे तराजू काटे,मेहनतीने भरलेला फळ भाजी इ वारंवार रस्त्यावर फेकून दिले आहे.

सोशल डिस्टन्गसिंग पाळले जात नाही,गर्दी होते म्हणून या छोट्या व्यावसायिकांना गेल्या दिड महिन्यापासून अमळनेर येथील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या छळाला सामोरे जावे लागत आहे.त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की ह्याच सर्व नियमांचे उल्लंघन आज पासून सुरू झालेल्या दारू दुकानांवर होत आहे. आता अमळनेर शासकीय अधिकारी कर्मचारी दारू विक्रेत्यांच्या किती दारूच्या बॉटल फोडतात हे पाहणे आवश्यक आहे. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले जातात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.एकाच दिवसांत विक्रमी दारू विक्री करणारा एका ठिकाणी बसून विक्री करत आहे.जी दारू अत्यावश्यक सेवा नाही. आणि ज्या गोष्टी जीवनासाठी आवश्यक आहेत त्या विकण्यासाठी मात्र गरीब हात मजूर दारोदारी विकत फिरत आहे.

आधीच अमळनेर शहरातील रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. आज दारू च्या दुकानातील गर्दी पाहता लवकरच ह्या संख्येत वाढ होणार आहे यात काही शंका नाही!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button