अमळनेर -येथील बाहेरपूरा भागातील राजे संभाजी मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने स्मशान भूमी , पैलाड येथे पाण्याची टाकी भेट दिली.
नूरखान
अमळनेर शहरातील चोपडा रोड लागत स्मशान भूमीत शहरातील बहुतांश अंत्यविधी हे केले जातात.भरपूर दिवसांपासून स्मशान भूमीत असलेली पाण्याची टाकी पूर्णतः जीर्ण झाल्याने त्यात पाणी संकलित होत नाही त्यामुळे अंत्यविधी वेळेस किंवा दशक्रिया विधी वेळेस नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं मंडळाचा कार्यकर्त्यांना लक्षात आले.त्यासअनुसरून सामाजिक बांधिलकी जपणारे मा. जिल्हानियोजन समिती सदस्य पंकजभाऊ चौधरी यांच्या सहकार्याने राजे संभाजी मित्र परिवार , शिवशक्ती मित्र परिवार यांच्या मार्फत स्मशान भूमीत 500 लिटर पाण्याची टाकी सुपूर्त करण्यात आली.प्रसंगी मंडळाचे कैलास पाटील, विजय चौधरी,आबा साळी,विष्णू पाटील, राकेश चौधरी,रवींद्र चौधरी, स्वामी चौधरी,रुणाल पाटील,भूषण अहिरराव, चेतन चौधरी,जयेश चौधरी, गणेश मेंबर,अमोल चौधरी,प्रशांतभाऊ पाटील,जयेश चौधरी,तुषार चौधरी,राहुल मराठे,फरहान शेख(मुन्ना),असलम बागवान,आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थतीत होते .






