राष्ट्रसंत,ह .भ.प .उत्तमराव महाराज , स्मृती ,
संगीत , कीर्तन , प्रबोधन सप्ताह.
स्थळ -साळशिंगी .
दिनांक 1/2/2020 पासून 8/2/2020 पर्यंत .
आयोजक –
साळशिंगी ग्रामस्थ आणि मानवता धर्म सेवा आश्रम .
मानवी कल्याण , देश प्रेम, अंधश्रद्धां निर्मूलन , शिक्षण प्रसार , संघटना , सामाजिक ऐक्य , व्यसन मुक्ती ,जातीभेद निर्मूलन , हुंडाबंदी ,,दारूबंदी , स्त्री शिकक्षण सन्मान , तंटामुक्ती,कर्मकांड , अश्या विविध कामासाठी श्री संत उत्तमराव महाराज यांनी हयातभर जण जागृती ,प्रबोधन केले .मानवता धर्म हाच खरा धर्म अशीं शिकवण दिली .
छत्रपती शिवाजी महाराजांचा ,पराक्रम ,कार्य ,कर्तृत्व ,चा
शिव प्रताप ग्रंथ , तसेच शंभूराजे प्रताप ग्रंथ लिहून ठेवले आहे .
समाज प्रबोधना साठी ,अभंग , चेतनास्पुर्ती भजन माला , पोवाडा , जवळपास 63 पुस्तके लिहून प्रकाशित केले आहे .
सत्यशोधक विचाराचे ,
स्वातंत्र्य सैनिक असलेले उत्तमराव महाराज यांनी समाज जागृतीचा अग्नी सतत पेटत ठेवला आहे .साळशिंगी गावी मानवता धर्म सेवा आश्रम स्थापना केली आहे.मदत आणि त्या ठिकाणी खूप काम करणेची गरज आहे .सत्य शोधक ,विचारांचे कार्य कारकर्ते सढळ हाताने मदत करतील अशीं अशा आहे .
कीर्तन , प्रबोधन ,स्मृति सप्ताह लाभा साठी , सहभागी होणे करिता विनंती आहे.






