विशाल मारकड यांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निमंत्रित सदस्यपदी निवड
पुणे : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निमंत्रित सदस्यपदी इंदापुर तालुक्यातील पडस्थळ येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल मारकड यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै संदीप भोंडवे यांनी दिले आहे. यावेळी कुस्तीगीर संघाचे सचिव दिनेश गुंड उपस्थित होते.
विशाल मारकड यांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सदस्यपदी निवड झाल्या नंतर इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.या वेळी निवडीनंतर कुस्ती सम्राट अस्लम काझी, सोलापूर महापौर केसरी नितीन खुर्द, हिंदकेसरी संतोष वेताळ, हिंदकेसरी सचिन जामदार, यांनी मारकड यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना विशाल मारकड म्हणाले की इंदापूर तालुक्यातील मल्लांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून काम करणार आहे.
यावेळी श्रावण चोरमले सागर रेडके युवराज नरोटे, नवनाथ तरंगे बिभीषण चोरमले आदी उपस्थित होते.






