Amalner

?️ अमळनेर कट्टा..आठवड्यातून दर सोमवारी जनता कर्फ्यु ! व नो व्हेइकल डे (दिवस) पाळण्यात येईल..

?️ अमळनेर कट्टा..आठवड्यातून दर सोमवारी जनता कर्फ्यु ! व नो व्हेइकल डे (दिवस) पाळण्यात येईल..

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे
म.उपविभागीय अधिकारी सो.अमळनेर व व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत समक्ष चर्चेनुसार स्वंयस्पूर्तीने नगर परिषद क्षेत्रातील आठवड्यातून दर सोमवारी मुख्य बाजारपेठ,दुकाने,बंद ठेवणे याबाबत निर्णय घेतला असून दर सोमवारी जनता कर्फ्यु व नो व्हेइकल डे (दिवस )आयोजन करण्याचे निश्चित
झाले आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय सेवेकरिता औषधे दुकाने,व दवाखाने तसेच कृषी सेवा विषयक दुकाने,दूध व्यवसाय वगळता) दर सोमवारी अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच राज्य शासनाने “माझी वसुंधरा” हे राज्य अभियान यशस्वीपणे राबविणे असल्याने अमळनेर शहरात पर्यावरण पूरक उपक्रम स्वच्छ प्रदूषण मुक्त हवेच्या उपलब्धतेसाठी हरित सुंदर संकल्पना करिता नो व्हेइकल डे (दिवस निमित्ताने दर सोमवारी सायकलचा वापर करावा अथवा पायी फिरावे किंवा सार्वजनीक वाहनाचा वापर करावा.
वरिल प्रमाणे दिनांक:०८/०३/२०२१ सोमवार रोजी अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने बंद ठेवावे व नो व्हेइकल डे (दिवस )निमित्ताने सायकलचा वापर करावा अथवा पायी फिरावे किंवा सार्वजनीक वाहनाचा वापर करावा.असे आदेश जारी करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button