?? कोरोनाच्या पाश्वभूमीवर पोलीस कर्मचारी गणेश चौधरी यांचा माणुसकी धर्म
अमळनेर प्रतिनिधी-
सध्या अमळनेर मध्ये कोरोना मोठे संकट आहे. यासाठी शासन, प्रशासन, अधिकारी, कर्मचारी आपआपल्या परीने त्याचा युद्धपातळीवर सामना करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी समाजसेवा करत असतात.
पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असतात. पण अमळनेर येथील एका पोलीस काँन्स्टेबल यांनी कर्तव्य बजावत जपलेली सामाजिक बांधीलकी व माणुसकीला सलाम..
त्यांच्या या कार्याचे अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी अभिनंदन केले आहे.
अमळनेर येथील पोलीस कॉन्स्टेबल गणेश चौधरी यांची कोरोना महा मारीत सॕनेटायझर फवारणी करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. गणेश चौधरी यांनी आपल्या भाच्याला अवि चौधरी याला सांगितले कि गांधीलीपुरा परिसरात फवारणी करून घे त्याने पोलीस बांधव त्यांच्या वाहनांना व गांधली पुरा पोलीस चौकीला फवारणी करून घेतली. महाराणा प्रताप चौक हर्षल ठाकूर च्या मदतीने तेथेही फवारणी करून घेतली. पो नि अंबादास मोरे यांनी विचारपूस केली व बालेमिया परिसरात फवारणी करायला सांगितले या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






