?️ अमळनेर कट्टा… शब ए बरात’ची नमाज घरातच करा पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले आवाहन…
अमळनेर : ‘अमळनेरसह देशभरात ‘करोना’चे संकट वाढत असताना रविवारी साजरा होणारा ‘शब ए बरात’चा सण आणि त्या दिवशी होणारी विशेष नमाज मुस्लिम बांधवांनी घरातच अदा करावी,’ असे आवाहन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मुस्लिम समाजाला केले.
मुस्लिम महिन्यातील ‘शाबान’ महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ‘शब ए बरात’ हा सण २८ मार्च रोजी, रविवारी आहे. या दिवशी रात्री विशेष नमाज पठण अदा केली जाते. नमाज पठणानंतर मध्यरात्री मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये जाऊन त्यांच्या पूर्वजांसाठी प्रार्थना करतात. मात्र, अमळनेरात ‘करोना’चे संकट वाढले असल्यामुळे बाहेर न पडण्याचे आवाहन दिलीप भागवत यांनी केले आहे. यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करून आणि सहकार्याची भूमिका घेऊन अमळनेरसह सर्व परिसरातील मुस्लिम बांधवांनी रविवारी होणारी ‘शब ए बरात’ची विशेष नमाज घरातच पठण करावी. तसेच, कब्रस्तानमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.







