आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण
अँट्रोसिटी दाखल करण्याची मागणी – बिरसा क्रांती दल पुणे उप आयुक्त कडे निवेदन द्वारे मागणी
पुणे / प्रतिनिधी – अभिजित भालचिम
केंब्रिज हायस्कूल भिलार (पाचगणी) मधील कर्मचार्यांवर अँट्रोसिटी कायदा व पोस्को अंतर्गत करण्याबाबत चौकशी करण्याची मागणी बिरसा क्रांती दल वतीने पुणे विभागीय उप आयुक्त प्रताप जाधव यांना निवेदन द्वारे केली
केंब्रिज हायस्कूल भिलार ( पाचगणी ) येथील नामांकित इंग्लिश मिडीयम शाळा मध्ये शिकत असलेले आदिवासी तेरा विद्यार्थ्यांना वर बेदम मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा. फाँस्को अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
पुणे जिल्ह्यातील हे सर्व विद्यार्थी आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ या तालुक्यातील दुर्गम आदीवासी भागातील असून ते शिक्षणासाठी पाचगणी येथे आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयातून पाठवण्यात आले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भितीमुळे मुले ही वस्तीगृहातून पळुन जातात. मुलांचे भिंतीवर डोके आपटणे वायरने मारणे मुलांचे लैंगिक शोषण केले आहे यामुळे ही मुले सर्व आदिवासी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित मुख्याध्यापक व कर्मचारी यांना अटक करण्यात यावी व संबंधित केंब्रिज हायस्कूल भिलार या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. पाचगणी मधील सर्व शाळेची चौकशी करण्यात यावी.
त्यावेळी बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी बी घोडे, राज्य संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका आशाताई सुपे, माजी नायब तहसिलदार यशवंत साबळे, बाळासाहेब सुपे, चिंधू आढळ, वसंत लांघी, तानाजी गवारी आदी नागरीक उपस्थित होते.






