?️अमळनेर कट्टा.. रणधुमाळी ग्राम पंचायतींची..अमळनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण जाहीर..असे आहे आरक्षण..
अमळनेर तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आज शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे काढण्यात आली.आरक्षण जाहीर करण्याच्या वेळी ग्रामपंचायत सदस्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
एस.टी. राखीव – शिरूड, मंगरूळ, चोपडाई, शिरसाळे, खेडी प्र. अमळनेर, निम, म्हसले, इंदापिंप्री, कावपिंप्री, चौबारी, भरवस, मारवड , ढेकू खु, टाकरखेडा..
एस. सी.- राखीव – खडके , कळमसरे , पळासदले, दोधवद , एकतास , मुडी प्र अ दरेंगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव – वाघोदे , सात्री, लोण बु , धानोरा , खेडी खु प्र ज , नगाव खुर्द , दहिवद खुर्द , धार , हिंगोणे खु प्र ज. रणाईचे खु , आमोदे , गडखाम्ब , निमझरी , आर्डी , बोहरे , मालपूर , कलाली , पिंगलवाडे , निंभोरा , सावखेडा , रुंधटी , मठगव्हान, गंगापूरी , जानवे , रढावन , बाम्हणे , शहापूर , वासरे, झाडी वावडे , जवखेडा , रणाईचे बु.असे आरक्षण जाहीर झाले असून आता खऱ्या अर्थाने गावातील राजकारण तापणार आहे.यावर्षी 67 ग्राम पंचायतींसाठी दि 15 जाने 2021रोजी निवडणूक घेण्यात आली. आणि 28 जाने 2021 आरक्षण जाहीर झाले.या कार्यक्रमामुळे निवडणुकीतील चुरस कमी होऊन साधारण पणे निवडणूक पार पडली.






