? आणि इथे ओशाळली माणुसकी…वयोवृद्ध महिलेला आणावे लागले सरकारी कार्यालयात
अमळनेर : शहरात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून अमळनेर तालुका कोरोना भूमी म्हणून ओळखला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल एक अनपेक्षित घटना घडली… एका वयोवृद्ध महिलेला तपासण्यास डॉ नी सरळ नकार दिला त्यामुळे त्या महिलेला उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले.
यागोदरही कोरोनाचा संशय घेऊन अमळनेर येथील काही स्थानिक डॉक्टर रुग्णांचा उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत अशी अनेक लोकांनी तक्रार केली होती. या मुळे अनेक सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. काही डॉक्टर तपासणी न करता सरळ सांगतात की ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयात घेऊन जा. ग्रामीण रुग्णालयाचे पत्र आणा तेव्हा आम्ही आमच्या रुग्णालयात रुग्ण दाखल करतो.
यावर कळस म्हणून की काय डॉक्टरांच्या पेशाला काळिमा फासणारी घटना आज अमळनेर शहरात घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या शेहेजाबी शेख महम्मद शेख ह्या महिलेला आज सकाळी सुमारे 10 वाजता हृदयविकाराचा झटका आला. तिच्या नातेवाईकांनी तिला शहरातील काही बड्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी न करता तिला कोरोनाचा संशय घेत रुग्णालयात दाखल न करण्याचे संगीतले व त्यांना रुग्णालयाच्या बाहेर काढुन लावले. त्या नंतर एका डॉक्टराने तुम्ही ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथून पत्र आणा असे सांगितले. या मुळे नातेवाईकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांना सांगितले. त्यांनी लगेच रुग्णालयात धाव घेतली. व डॉक्टरांना समजावून सुद्धा त्या डॉक्टरांनी ऐकले नाही. नंतर ते रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले मात्र तेथे गेल्यावरही तेथील डॉक्टरांनी त्या महिलेस धुळे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र धुळे घेऊन जाऊन लॉकडाऊन मुळे बाकीची व्यवस्था कशी करावी. या विचारांनी त्रासलेल्या संतप्त नातेवाईकांनी त्या महिलेस सरळ अमळनेर येथील प्रांत कार्यालयात आणले.याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ ताडे हे आले आणि त्यांनी सदर महिलेला तपासून लगेच त्या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. व त्या महिलेस त्या ठिकाणी उपस्थित नातेवाईक तसेच संबंधित प्रभागाचे नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी त्या महिलेस त्या संबंधित रुग्णालयात दाखल केले आहे.
डॉक्टरां ना प्रशिक्षण झाल्या नन्तर एक शपथ देण्यात येते त्यात कोणताही रुग्ण हा महत्वाचा असून त्याचा इलाज करणे आद्य कर्तव्य आहे. परन्तु अमळनेर शहरातील डॉ ही शपथ विसरलेले दिसतात.जरी परिस्थिती नाजूक आहे तरी योग्य ती खबरदारी घेऊन मशहरातील डॉक्टरांनी आपली सुरक्षा राखत रुग्णांना आधी तपासून घ्यावे नंतर कोरोना बाबत संशय घ्यावा असा सूर जनमानसातुन उमटत आहे.






