Amalner

बोरी नदीतून दिवसरात्र शिरूड मार्गी सर्रास रेती वाहतूक कसा काय सुरू आहे हा काळाबाजार प्रशासनाने तात्काळ घ्यावी दखल…

बोरी नदीतून दिवसरात्र शिरूड मार्गी सर्रास रेती वाहतूक कसा काय सुरू आहे हा काळाबाजार प्रशासनाने तात्काळ घ्यावी दखल

रजनीकांत पाटील

अमळनेर ता बोरी नदीतून शिरूड मार्गी सर्रास वाळू वाहतूक सुरू मंगरूळ,कवपिंप्री, जानवे खेड्यात पोहचते वाळू यात ट्रॅक्टर व लहान टेम्पो अँपे गाड्यांचा समावेश असल्याने दिवसा तसे रात्री नागरिकांची झोप मोड होत असते या बाबत त्यानां कोणी बोलले असता ती बिनधास्त दादागरी ची भाष्य वापरात आमचे कोणी काही करू शकत नाही असे उत्तर ते वाळू वाहतुकदार गावातील नागरिकांना देत असता याबात बऱ्याच वेळा भांडणी झाल्या असल्याचे ओरड आल्याची ठोस प्रहार समोर आले आहे या बाबत वाळू वाहतून करणारे अँपे, लहान टेम्पो गाड्या ह्या बिना नंबर प्लेट नसल्याने तर काही नंबर खाडाखोड केल्याची दिसतात. मोकाट वाहने रस्त्यावर धावतात या बाबत देखील वारंवार प्रशासनाला तक्रारी करूनही त्या कुठल्याही प्रकारचा परिणाम अथवा वाळू वाहतूकीवर कार्यवाही झाली नाही.
तसेच शिरूड येथील रात्रीच्या वेळेस नागरिकांची झोप मोड होत असल्याने रोज संताप व्यक्त करत असतात या बाबत कार्यवाही का होत नाही असा प्रश्न नागरिकांत फिरत आहे.
मात्र या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन वाळूवाहतूक करणाऱ्यांन वर प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button