Kolhapur

26 नोव्हेंबर चा देशव्यापी संप संपूर्ण ताकतीनिशी यशस्वी करा..

26 नोव्हेंबर चा देशव्यापी संप संपूर्ण ताकतीनिशी यशस्वी करा..

शिवाजी मगदूम कोल्हापूर

कोल्हापूर : भाजप सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दि २६ एप्रिल रोजी होणाऱ्या संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे अहवान सिटुचे राज्य सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी केले ते मुरगुड येथे समाजवादी प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या सिटुच्या विभागिय बैठकीत केले. मिटींगच्या अध्यक्षस्थानी कॉ. बाळासाहेब कामते हे होते.
मुरगुड येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागिय बैठकीकरीता कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील सिटू अंतर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, उस तोडणी कामगार संघटना, किसान सभा, एसएफआय संघटना आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कॉ शिवाजी मगदूम पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणातुन संपुर्ण देशभर अर्थिक मंदी अाल्यामुळे मोठमोठ्या औधोगिक कंपण्या बंद पडत आहेत. त्यामुळे असलेले रोजगार जात आहेत, कंत्राटीकरणामुळे बेरोजगार तरूणांना सातत्यपूर्ण रोजगाराची शाश्वती नाही. सार्वजनिक उधोगाचे खाजगीकरण करण्याचे धोरण मोदी सरकार राबवित आहे. संघटीत तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्यामध्ये वाढच होत आहे.सरकारच्या या कामगार कष्टकरी जनतेच्या धोरणाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या या कामगार व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दि २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरातील सर्व कामगार संघटना व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे.त्याची सर्वस्वी जबाबदारी सिटुच्या सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी.
यावेळी बोलताना नगरपालिका युनियनचे नेते कॉ बबन बारदेस्कर यांनीही केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात परखड मत मांडत २६ नोव्हेंबरचा संप यशस्वी करण्याचे अहवान केले.
यावेळी विक्रम खतकर, उज्ज्वला पाटील, दिनकर आदमापूरे, संदीप सुतार, मनिषा पाटील, आनंदा डाफळे, रमेश निर्मळे, बाळासाहेब कामते, प्रतिभा इंदुलकर, गिता गुरव, संदेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कॉ मोहन गिरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर शेवटी आभार राजाराम आरडे यांनी मानले.
या मिटींगसाठी प्रकाश रामाणे, जोतिराम मोंगणे, अनिता अनुसे, सरीता पाटील, निता काशीद, रघुनाथ वडर, एस के नलवडे,मारूती कांबळे, सदाशिव पाटील, सुजाता फराकटे, राणी मगदूम, संगिता कामते, शिवाजी कांबळे यांच्यासह कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यातील सिटु अंतर्गत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मागण्या
१)कामगारांना गुलाम बनविणाऱ्या कामगार संहिता रद्द करा.
२) शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारे कायदे रद्द करा.
३)बांधकाम कामगारांची मेडीक्लेम योजना सुरू करा.
४)नोंदीत बांधकाम कामगारांच्याकरीता राष्ट्रीय पातळीवर मेडीक्लेम योजना सुरू करा.
५)राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, व आशा, गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा.
६)बांधकाम कामगारांना घरासाठी १० लाख अनुदान द्या.
७)ऊस तोडणी कामगारांच्यासाठी स्थापन केलेल्या गोपीनाथ मुंडे महामंडळाचे काम तातडीने सुरू करा.
८)केंद्रीय किचन पद्धत रद्द करा.
९)आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषन आहार कर्मचाऱ्यांना २१०००/-रुपये किमान वेतन द्या.
१०)आशा व गटप्रवर्तक यांना विनामोबदला कोणतेही काम लावु नये.
११) कायदे लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना मासिक 7500/- रुपयांचे रोख रकमेच्या हस्तांतर करा
१२)सार्वजनिक क्षेत्रातील उधोगांचे खाजगीकरण बंद करा.
१३)पेट्रोल व डिझेल दरवाढ मागे घ्या.
१४) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा.
१५)शासकीय कार्यालयातील रीक्त जागा तात्काळ भरा, अन्यथा बेरोजगार भत्ता द्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button