Kolhapur

एच आर पाटील यांची अभिनंदनीय निवड

एच आर पाटील यांची अभिनंदनीय निवड

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कोनवडे ता. भुदरगड येथील प्रा . एच . आर . पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राज्यशास्त्र महाविद्यालयीन परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
ते दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज बिद्री येथे
कार्यरत आहेत .
यावेळी प्रा . संपतराव मोरे यांची अध्यक्ष म्हणून तर प्रा.धनाजीराव देसाई यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली .
त्यांना दूधसाखर शिक्षणसंकुलाचे अध्यक्ष आमदार के. पी . पाटीलसो,संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटेसो, कार्यकारी संचालक आर . डी देसाईसो सेक्रेटरी श्री कुलकर्णीसो, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य .आर .व्ही . पाटील, उपप्राचार्य एस .एस . पाटील,
उपमुख्याध्यापक प्रा . एस . बी जाधव, पर्यवेक्षक एन .पी .फराकटे, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा.एन . डी पाटील यांचे सहकार्य लाभले .
प्रा. हिंदुराव पाटील यांनी एकवीस वर्षे दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री ता. कागल येथे, तर मडिलगे बु ॥, कडगाव, गारगोटी ,हसुर खुर्द येथे चार वर्षे अशी २५ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे . त्यांचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन निवड करण्यात आली आहे . या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button