Champa

चांपा ग्रामपंचायतीतर्फे बालग्राम सभेचे आयोजन

चांपा ग्रामपंचायतीतर्फे बालग्राम सभेचे आयोजन

अनिल पवार

चांपा ता , १३ : चांपा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने आपला गाव, आपला विकास कार्यक्रमांतर्गत पहिल्यांदाच चांपा ग्रामपंचायत येथे बाल ग्रामसभचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार होते , तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुभाष सानप , ग्रामविकास अधिकारी बि .बि .वैद्य आदींसह जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक येरखेडे आणि अंगणवाडी सेविका शिला अडकणे , व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या वतीने सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक येरखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. त्यानंतर सरपंच अतिश पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी यावेळी . त्यानंतर सरपंचांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले.
यावेळी विद्यार्थ्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत
खेळीमेळीच्या वातावरणात ही बाल ग्रामसभा संपन्न झाली. सदर कार्यक्रमासाठी चांपा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अर्चना सिरसाम , सदस्या अस्मिता अरतपायरे , मीराबाई मसराम , रेश्मा राऊत , सफल मुन
आदींसह विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ग्रामविकास अधिकारी बी.बी.वैद्य यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button