Aurangabad

विज बिल माफ करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

विज बिल माफ करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करून नवीन नवीन बिल आकारणी योग्यरीत्या करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीतर्फे आज मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंदील भेट आंदोलन करण्यात आले.

यावेळी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ खोतकर, सचिव अनुप वाढवे, जिल्हा उपाध्यक्ष एस.डी. जगताप व सतीश साळवे उपस्थित होते.

*या आहेत प्रमुख मागण्या*

दोनशे युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे. मीटर भाडे कपात करण्यात यावे. विजेता स्थिर आकारावर प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी. सक्तीचे वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी. ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च 2020 पासून भरले त्याच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीजबिल निल पाठवावे. तीस दिवसांनंतर रीडिंग घेणाऱ्या व्यक्ती वर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button