ब्रेकिंग न्यूज
गटविकास अधिकारी यांची कमाल…. शासकीय खुर्चीवर बसविले आपल्या मुलीला खुर्चीचा अपमान…अधिकार पदाचा गैरवापर…
वरिष्ठ अधिकारी यांनी कार्यवाही करण्याची गरज
जयश्री साळुंके
अमळनेर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मीडियावर म्हणजे च फेसबुकवर आपल्या मुलीचा ऑफिस मधील शासकीय खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल केला आहे.अश्या पद्धतीने आपल्या मुलांना शासकीय वस्तू वापरायला देणे, खुर्चीवर बसविणे शो म्हणून फोटो काढणे हे कितपत योग्य आहे. हे शिस्तीचा भंग असून वरीष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शासकीय अधिकारी यांच्या विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात त्या शिस्तीत पूर्ण करणे आवश्यक असते. अश्या पद्धतीने बेशिस्त पध्दतीने शासकीय नियमांचे उल्लंघन करून खुर्चीचा उपयोग मुलीचा फोटो काढण्यासाठी वापरणे योग्य नाही.






