महाराष्ट्र मराठी 7 बातमीचा दणका…गट क्र 1313 च्या अनधिकृत बांधकाम आणि अवैध गौण खनिज साठवण बातमी ला मिळाला न्याय..तहसीलदार यांनी बांधकाम व्यावसायिकास काढली नोटीस…
जयश्री साळुंके
अमळनेर येथे विना परवानगी बांधकाम सुरु असून मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठा करून ठेवल्याची बातमी महाराष्ट्र मराठी 7 ने प्रकाशित केली होती.या अनुषंगाने अमळनेर येथील गरजेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज साठवून ठेवल्या बद्दल अमळनेर तहसीलदार यांनी मालकास नोटीस बजावली आहे.यासंदर्भात दि 10 जाने 2020 च्या पत्रा नुसार संबंधित बांधकाम व्यावसायिक अवैध रित्या गौण खनिज साठवणूक केली असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7) प्रमाणे दंडात्मक कार्यवाही का करण्यात येऊ नये यासंबंधी बांधकाम व्यावसायिक यांचे म्हणणे मंडण्या साठी दि 16 जाने 2020 ही तारीख देण्यात आली आहे.
यात
वाळू 40 ब्रास किंमत 7,69,000/-
मुरूम 222 ब्रास किंमत 8,88000/-
पिवळी माती 800 ब्रास किंमत 24,00,000/-
एकूण 40,57,000/-रु
असे गौण खनिज साठवून ठेवले आहे. सदर प्रकारात आवश्यक ती कार्यवाही त्वरित व्हावी अशी अपेक्षा आहे.






