Nashik

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे Onlineपद्धतीने शिक्षक दिन साजरा…..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे Onlineपद्धतीने शिक्षक दिन साजरा…..

सुनिल घुमरे नाशिक

:-५सप्टेंबर२०२० रोजी जि.प.प्राथ. शाळेत शिक्षकांनी कोरोना १९ चा प्रादुर्भाव असल्याने सोशल मिडीयाचा वापर करुन Online पद्धतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शिक्षक दिन Online पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना श्री.मनोहर उखाजी देसले यांनी मुख्याध्यापक श्री.संजय शंकर चौधरी सर व आपल्या सहकार्यांना सांगितली व सर्वांनी सहमती दिली आणि त्याप्रमाणे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.शंकर ठाकरे सर यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने उत्कृष्ट नियोजन केले व Online शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून जबाबदारीही स्विकारली त्यामुळे शाळेत एक आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला. जवळ३०/३२ विद्यार्थ्यांनी Online स्वरूपात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणे केली.शिक्षकांनी देखील आपल्या भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव केला.

माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री.मातेरे सर यांनी देखील मुलांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. गावातील शिक्षण प्रेमी नागरिक ही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचेही कौतुक केले. सदर या Online शिक्षक दिन या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री.उत्कर्ष कोंडावार व श्रीमती. प्रतिभा गुरव म्याडम यांनी काम पाहिले व प्रत्येक वर्गातून तीन उत्कृष्ट भाषण करणारे विद्यार्थांची निवड केली या निवड केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.चौधरी सर यांनी त्यांच्या वडिलांचे स्मरणार्थ बक्षिसे जाहीर केली व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन म्हणून त्यांनाही बक्षिसे दिली. अशा या Online शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे शेवटी श्री.सुधाकर भामरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button