? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबनेची अफवा..गावात तणाव.. सामंजस्याने निवळले तणावाचे वातावरण…
अमळनेर : काल सकाळी तालुक्यातील खवशी येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची अफवा पसरली होती. मात्र ग्रामस्थांच्या सामंजस्याने तणावाचे वातावरण निवळले आहे.
सदरची घटना कानावर आल्यावर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, पी एस आय वाघ, पी एस आय शिंदे व सहकाऱ्यांनी तत्काळ खवशी येथे भेट दिली. व गावातील पुतळ्याची पाहणी करत असताना अर्धाकृती पुतळ्याच्या हाताच्या बाजूस शेणाचे शिंतोडे लागल्याचे दिसून आले . मात्र सदरची घटना लहान मुलांच्या खेळण्यातून झाल्याचे निदर्शनास आल्याने मूर्तीचे विधिवत स्नान व पूजन पो. नि. अंबादास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी संयम आणि एकोपा दाखवल्याने तणाव निवळला. त्यानंतर पुतळ्याच्या परिसरात गुरे बांधण्यावर बंदी घालण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यासह पोलिस पाटील राहुल पवार, बी के सूर्यवंशी, रोहिदास कापडे, कैलास पाटील तसेच गावातील तरुण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.






