उद्यापासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धीचा थरार..
पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर
आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मल्ल म्हाळुंगे-बालेवाडी नगरीत दाखल झाले आहेत. आज दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी सर्व तांत्रिक आधिकार यांचे आगमन झाले असून सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात पंच उजळणी वर्ग घेण्यात आलेला आहे. तसेच दिवसभरात सर्व ४५ संघाचे प्रवेशिका जमा करून घेण्यात येत होत्या. आज सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत ‘अ विभाग’ मधील ५७ व ७९ किलो वजनी गटातील वैद्यकीय तपासणी व वजने घेण्यात येतील. तर उद्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात कुस्ती लढतीला सुरवात होणार आहे. मातीतील कुस्ती साठी दोन आखाडे व मॅटवरील कुस्ती साठी दोन आखाडे अशा एकूण चार आखाड्यात एकदम चार रंगतदार कुस्तीचा थरार कुस्ती शौकीन व कुस्ती प्रेमींना अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा सर्वांना पाहतायावी यासाठी कुस्ती स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कुस्तीगीर परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चैनल व फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे.






