“कोरोना” महामारीत देखील वैद्यकीय सुविधा देणार्या खाजगी डॉक्टरांना पीपीई सरंक्षण किट व सॅनिटायझर वाटप…
विक्की खोकरे
एरंडोल – जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून तरी सुद्धा या कोरोनाचा प्रादुर्भावत आपल्या जिवाची पर्वा न करणार्या खाजगी डॉक्टरांना त्यांची स्वतःची काळजी घेण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने एरंडोल तालुक्यातील जवखेडे येथील माजी सरपंच व अंजनी हायस्कूलचे चेअरमन तथा वसंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक,श्री गणसिग गोबा पाटील यांच्या तर्फे एरंडोल शहरातील डॉक्टरांच्या सेवेची दखल घेण्यात आली व जवखेडे येथे ग्रामपंचायतमध्ये श्री.गणसिग गोबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना पीपीई संरक्षण किट व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,सेक्रेटरी डॉ. राहूल वाघ, डॉ.ज्ञानेश्वर अहिरे,डॉ.कुणाल चौधरी,डॉ. किशोर पाटील, रुग्ण सेवक म्हणून ओळखले जाणारे विक्की खोकरे आदी उपस्थित होते.
गणसिग पाटील यांनी आमच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आम्हास संरक्षण किट उपलब्ध करून दिले त्या बद्दल एरंडोल मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ सुधिर काबरा यांनी आभार मानले.






