Surgana

सोयी सुविधा उपलब्ध न झाल्यास येणाऱ्या निवडणूकीत मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा पाच ते सहा पाड्यावरील ग्रामस्थांचा निर्णय.

सोयी सुविधा उपलब्ध न झाल्यास येणाऱ्या निवडणूकीत मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा पाच ते सहा पाड्यावरील ग्रामस्थांचा निर्णय.

“आमालबी माणूस म्हणून जगू देजोस..मायबाप सरकार..
आम्ही पण माणसं हायेत..जनावरां नाय..
अतिदुर्गम भागातील आदिवासींची सरकारला आर्त हाक..
सुरगाणा ता. २२/८/२०२२

सरकारनं सांगलं तसं आमी बी घराघरालं झेंड लावलंत.आता आमचे कड बी जरा लक्ष देजोस सरकार..
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.अतिदुर्गम भागात हरघर झेंडा फडकवला गेला पण अजूनही अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज मुलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे.आरोग्य, शिक्षण,पूल,वीज,पाणी या समस्या सोडविण्यासाठी झगडावे लागत आहे.या आदिवासी बोली तील शब्द बरेच काही सांगून जातात..
आमची कामां मंजूर केली नाय..तर येणाऱ्या चुटणीत(निवडणूकीत)मतदान नाय करजन..आमचं पाड्यावर मत मागायलं येवांच नाय..आलस तर ठेमकं घेण ऊठू..आमची पिढी बरबाद झाली पण आता पावेतो सुधारणा काहीच झाली नाय.ताहा आता आमी डवरां अन बांडगाही ठरवलांय का आमची पुरी कामा मंजूर नाय झाली त येणाऱ्या निवडणूकीत मत नाय टाकजन..आमचे चार पाच पाड्यावर कनचाही पुढारी व पक्ष येतील तर त्याहल उभा राहू देजन नाय..आम्ही पाणी पन पियालं दयाव नाय..जे येतील तेही कशाक काय करतील त्याचा तपास नाय..आम्ही त्याहलं टेमक्याखल लगावत न्यांव..मग तुम्ही आम्हांल सांगसाल.. कशाज ह्यां केलां…पुढा-यांनी आमची कामा नाय केली ताहा आम्ही ठेमकं घेणं उठू..या आहे
आहेत अस्सल आदिवासी कोकणी,डांगी बोली भाषेतील आदिवासी बांधवांच्या
तोडूंन निघालेल्या तहसील कार्यालयात विविध प्रकारच्या समस्या बाबत निवेदन सादर करतांना उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया.हे आदिवासी बोलीतील शब्द बरेच काही आपल्याला सांगून जातात. शुक्रवारी १९ रोजी अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात बलसाड,धरमपूर सीमेलगतच्या खिरपाडा खो, वांगण खो, सागपाडा,वडपाडा, कहांडोळपाडा खो,खोबळा दिगर या पाड्यावरील ग्रामस्थांनी तहसिलदार यांना निवेदन सादर केले की,आम्हाला वेळोवेळी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या पार नदीवर पुल होणे गरजेचे आहे. नदीच्या पलीकडे अगदी हाकेच्या अंतरावर गुजरात राज्यात टोकलपाडा, बोरपाडा,भितरुंड, मोहाची माळी,पाचविहरा हि धरमपूर तालुक्यातील गावे आहेत.या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्की सडक,आरोग्य, वीज,पिण्याचे शुद्ध पाणी,शिक्षण या मुलभूत गरजा आदिवासींना पुरवल्या आहेत.मात्र महाराष्ट्र राज्यातील पाच ते सात पाड्यावरील दोन ते अडीच हजार आदिवासी बांधव अजूनही अनेक मुलभूत सुविधा पासून वंचितच आहेत.नदिच्या पलीकडे रोटी, बेटीचे व्यवहार,नातेसंबंध आहेत.पण कोणाचा मृत्यू झालाच तर अंतिम दर्शनाला पण पार नदीवर पूल नसल्यामुळे मृताचे तोंड पहायला जाता येत नाही. पावसाळ्यात सहा महिने तर खुपच हालअपेष्टांचे ओझे सहन करावे लागते. किराणा घेण्यासाठी तर टायरावरुन पुरातन जीव धोक्यात घालून पोहत जावे लागते.
शासनाने याचा गांभीर्याने विचार करून खिरपाडा ते पाचविहिरा नवीन पूल बांधण्यात यावा, भेनशेत ते खिरपाडा खो हा १४ कि.मी.रस्ता डांबरी करावा,थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत करावा,खोबळा दिगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे,नार,पार नदीवर केटी वेअर सिंमेट बधारे बांधून पाणी उपलब्ध करुन द्यावे, दुर्गम भागात रुग्णवाहिका मंजूर करावी,एस.टी बस सुरु करावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शिष्टमंडळात रमण गोबाले,काळू काळाईत, भाऊराव सानवणे,रघू इजल, गुलाब दोडके,पंडीत दोडके, चिंतामण इजल,रमेश तुरे,विजय दोडके,केशव जोगारे,गणपत धाडर,महादु इजल,सुरेश मोहडकर,चंदर काळाईत आदींचा समावेश होता.या निवेदनावर तिनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्या आहेत
विजय कानडे
सुरगाणा नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांना समस्यांचे निवेदन सादर करतांना सागपाडा वांगणपाडा खोबळा वडपाडा खिरपाडा येथील ग्रामस्थ
कमरे एवढ्या पुरातन पार नदी उतरतांना वयोवृद्ध याच जागेवर पुलाची मागणी केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button