Amalner

अमळनेरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी

अमळनेरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी

रजनीकांत पाटील

अमळनेर प्रतिनिधी– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 225 वी पुण्यतिथी त्यांच्या बस स्टँड जवळील स्मारकावर बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आली.यावेळी डी. ए.धनगर, हरचंद लांडगे, वसुंधरा लांडगे यांनी अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. भाषणातून अहिल्यादेवींनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची साक्ष अजूनही संपूर्ण भारतभर पाहावयास मिळते. असे प्रतिपादन केले. तसेच जवखेडा ता.अमळनेर येथील आदर्श पोलीस पाटील कै.उल्हास बापू लांडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समाज अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, नितीन निळे,प्रभाकर लांडगे, दशरथ लांडगे, पंडित लांडगे, दिनेश भलकार,विठोबा साबे,प्रदीप कंखरे,ईश्वर महाजन, बापूराव सांगोरे,शशिकांत आढावे,सुनील हटकर,रमेश शिरसाठ, जगदीश निळे,राजेंद्र मनोरे, अभिषेक लांडगे, ईश्वर ठाकरे, परशुराम महाले, अनिल चौधरी, ए.के.धनगर, सागर निळे,महेंद्र धनगर उपस्थित होते. कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत सामाजिक अंतर व मास्क लावून कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button