आशा कर्मचार्यांना मारहाण करणाऱ्या कुटुबियांवर कारवाई करा- कॉ .शिवाजी मगदूम
लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी..
कोल्हापूर प्रतिनिधी–तुकाराम पाटील
देशामध्ये कोरोणा सारखे महाभयानक संकट आलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोणा विरूध्द युद्ध करायचे काम आपल्या देशातील आशा, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य कर्मचारी करत आहेत. अाशा व गटप्रवर्तक यांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर आपला जिव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर त्यांचं कुटुंब सुद्धा चालत नाही अशा परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून देश सेवाच करीत आहेत.
त्या घरोघरी जाऊन सर्व कुटुंबाचा सर्वे करीत आहेत. देशभर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका मोठ्या जिद्दीने कोरोणा विरोधातील लढाई लढत आहेत.
असे असताना आज भुदरगड तालुक्यातील म्हसवे या गावातील सुरेश तांबेकर व त्याचा मुलगा शेखर तामबेकर या पिता पुत्रानी सर्व्हे साठी गेलेल्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे.
शासन व प्रशासनाने तातडीने या कुटुबियावर कारवाई करून कडक कारवाई करावी. अन्यथा जिल्ह्यातील आशा अंगणवाडीसह सर्वच आरोग्य कर्मचारी भयभीत होऊन काम करण्यास पुढे येणार नाही, व त्याचा परीणाम कोरोणा आजाराचा संसर्ग वाढण्यामध्ये होऊ शकतो.
लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतिने झाल्या प्रकाराचा निषेध करून आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम, कॉ. प्रकाश कुंभार कॉ भगवानराव घोरपडे कॉ संदीप सुतार कॉ विक्रम खतकर कॉ शिवाजी मोरे कॉ आनंदा कराडे कॉ कुमार कागले कॉ मनोहर सुतार कॉ रमेश निर्मळे कॉ मोहन गिरी कॉ दगडु कांबळे कॉ पोपट कुरणे कॉ परसराम कांबळे कॉ नवनाथ चौगुले कॉ दत्ता कांबळे कॉ नामदेव पाटील कॉ अजित मगदूम कॉ दत्ता गायकवाड यांनी केली आहे.






