अज्ञात वाहनाची टुव्हीलरला धडक एक गंभीर
महेश हुलसूरकर हुलसुर
कर्नाटक : शाहजणी औराद येथील पती पत्नी टुव्हीलर एम एच २४ एस ५७९७ वर भाल्की तालुक्यात नातेवाईकांच्या अंतिम संस्कारासाठी आले असता कार्यक्रम आटपून वापस शाहजणी औरादला ४ वा. येत असताना केसरजवळगा व दापकाच्या मध्ये अज्ञात वाहणाने माघुन जोराची धडक दिल्याने मुकेश भंडारे यांच्या पायवरुन गाडी गेल्याने गंभीर जखमी झाले आहे व पत्नी बबीता भंडारे याना किरकोळ मार लागला आहे हुलसूर सरकारी दवाखान्यात उपचार करून पुढे उपचारासाठी बिदर ब्रिम्स दवाखान्यात पाढवीण्यात आला.
मेहकर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






