Amalner

शिरूड गावाचे भूमिपुत्र डॉ संजय सांगोरे व सौरभ सांगोरे गावासाठी आरोग्यवर्धक मदत

शिरूड गावाचे भूमिपुत्र डॉ संजय सांगोरे व सौरभ सांगोरे गावासाठी आरोग्यवर्धक मदत

रजनीकांत पाटील

अमळनेर :- शिरूड
हाक गावाची ….मदत डॉ. सांगोरे यांची ..!
कोरोना च्या संकटाला सामोरे जातांना शिरूड गावाचे भूमिपुत्र मुंबई येथील डॉक्टर सौरभ सांगोरे उर्फ डॉ संजय भिला धनगर यांनी गावासाठी आरोग्यवर्धक मदत पाठवली आहे.त्यांनी 500 कुटुंबास पुरेल इतके सॅनिटीझर,१५ डिस्पोजल किट आणि १० वाशेबल किट असे एकूण 25 पीपीई किट , व काही मास्क अशी मदत पाठवली आहे. स्व.भिला भाऊसाहेब यांच्या स्मरणार्थ त्यांचे लहान बंधू डॉ राज सांगोरे उर्फ भैय्यासाहेब यांनी आज सकाळी सदरचे साहित्य पाठवले. आज दि.१० जून ला सदरचे वितरण करण्यात आले.

सरपंच सुपडू पाटील,जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील,पत्रकार मिलिंद पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे , शिरूड हायस्कूल चे संचालक जयवंतराव पाटील.ग्रामसेवक गुलाबराव सूर्यवंशी, पत्रकार रजनीकांत पाटील, आरोग्य सेविका अनिता पाटील, आरोग्य सेवक योगेश गावित,आशा सेविका पूनम पाटील,कल्पना पाटील,बाळकृष्ण पाटील व इतर ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टन्स पाळून सदर कार्यक्रम संपन्न केला.
या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद पाटील यांनी केले .शिवसेनेचे मुंबईचे रवींद्र बैसाणे,पत्रकार शरद कुलकर्णी ,रवींद्र धनगर यांचे विशेष सहकार्य लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button