Aurangabad

औरंगाबाद दंगल, गोळीबारप्रकरण; सिल्लोड पोलीसात 60 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद दंगल, गोळीबारप्रकरण; सिल्लोड पोलीसात 60 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर गावातील लोकांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावात दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. दीडशे ते दोनशे गावतील लोकांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील केळगाव या गावात घडलेल्या दंगल आणि गोळीबारप्रकरणी तब्बल ६० जणांवर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला
मिळालेल्या माहितीनुसार गावतील दीडशे ते दोनशे लोकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर अचानकपणे हल्ला चढवला होता.
आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की, हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा देखील करावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी रात्रभर अटकसत्र राबवून तब्बल ६० जणांना ताब्यात घेतलं
जमावाने केलेल्या हल्ल्यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. यावेळी धावपळ देखील झाली होती. या धावपळीत १ पोलीस अधिकारी आणि ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर अटकसत्र राबवले आणि तब्बल ६० जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या घरावर जमावाने हल्ला करून घराची मोडतोड केली होती. आक्रमक बनत चाललेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत लाठीचार्जही केला होता.
५२ जणांवर दंगलीचा गुन्हा तर ८ जणांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल
आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या पोलीस पाटील महिलेने विष प्राशन केले होते. महिलेवर सिल्लोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गावात दंगल झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात ५२ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी घडली होती ही घटना

औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात देखील काही महिन्यांपूर्वी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली होती. घरात घुसून महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार अंधारी गावात बिअर बार चालकाकडून घडला होता. महिलेला पेटवल्याप्रकरणी आरोपी संतोष मोहितेला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला घरी एकटीच असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपी तिच्या घरात घुसला. रात्रीच्या वेळेत घरी येण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं असल्याचे समोर आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button