Chalisgaon

व्हि एच पटेल चेअरमन पदावरून राजेंद्र चौधरी यांना बडतर्फ करा – शिवप्रेमी संघटनाची नारायण अग्रवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

व्हि एच पटेल चेअरमन पदावरून राजेंद्र चौधरी यांना बडतर्फ करा –

शिवप्रेमी संघटनाची नारायण अग्रवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी – मनोज भोसले

शतकोत्तर कारकीर्द असणाऱ्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी ह्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेची परंपरा असताना चा ए सोसायटी संचालक मंडळ व्हि एच पटेल चेअरमन राजेंद्र चौधरी यास पाठीशी घालुन संस्थेला बदनाम करण्याचे काम करत आहेत शिवरायांची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचा केवीलवाणी संस्थेचा अठाहास आहे त्यामुळे संस्थेला ग्रहण लागण्यास वेळ लागणार नाही .पवित्र शिक्षण संस्थेत अशी घाण विकृती चेअरमन पदावर ठेवणार असाल तर आपल्या संस्थेत भावी पिढी घडेल कशी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही ,मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांच्या कडे व्हि एच पटेल विद्यालयाच्या चेअरमन पदावरून राजेंद्र चौधरी यांना बडतर्फ करण्याची मागणी शिवप्रेमी संघटनेच्या वतीने दि ३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची सभा दि १ रोजी घेण्यात आली मात्र कोरम अभावी सभा तहकूब झाली यात संचालक मंडळ घाणरेडे राजकारण करत असून ते त्यांच्या आगाशी आल्या शिवाय राहणार नाही शिवभक्तांचे रोष चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी पदाधिकारी व संचालकाना लवकरच सामोरे जावे लागेल .आपल्या आदेशा ला संचालक मंडळ नकार देउच शकत नाही आपण वेळ मारून नेत आहात पण ती वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आपण मॅनेजिंग बोर्ड चेअरमन पदाचा वापर करून संस्थेत मनासारखे अनेक कामे केली आहेत हे सर्वशृत आहे.

मग या प्रकरणात आपण अंग कसे काढु शकतात आपल्या अधिकार पदाचा वापर करुन राजेंद्र चौधरी ला चेअरमन पदावरून काढावे , आपण वरील गोष्टींचा सारसार विचार करून व्हि एच पटेल चेअरमन पदावरून राजेंद्र चौधरी याला तात्काळ काढावे असे न झाल्यास आपल्या निवासस्थाना समोर शिवप्रेमी संघटना वेगवेगळ्या पध्दतीने उग्र आंदोलन करतील किंवा कोरोना ची माहामारी असताना शिवप्रेमीना आंदोलन करण्यास भाग पाडु नये असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर …………..
वर खुशाल पाटील, सचिन पवार,उत्कर्ष शिंदे,हेमंत पाटील,पप्पू पाटील ,संजय कुलकर्णी ,गणेश पवार
अदि च्या सह्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button