Baramati

बारामतीत कोरोनाबधित रुग्णाची संख्या 4 वर

बारामतीत कोरोनाबधित रुग्णाची संख्या 4 वर

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- बारामती मध्यें कोरोनाबाधित रुग्णाची संख्या4 वर पोहचली आहे त्यामुळे आत्ता बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे.काल सापडलेला भाजीपाला विक्रेताच्या घरातील सून व मुलगा ह्याचे टेस्ट पॉसिटिव्ह आल्याने बारामती परिसरातील श्रीरामनगर येथील लोंकाचे झोप उडाली आहे.
बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही मोकळ्या वेळेत घराबाहेर फिरू नये,संचारबंदी कोणीही उल्लंघन करू नये अश्या सक्त सूचना प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत.
बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की श्रीरामनगरपासूनचा 3 किलोमीटर पर्यन्तचा परिसर सील करण्यात आला आहे.तसेच 5 किलोमीटर पर्यन्तचा परिसर बफरझोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.श्रीरामनगर परिसरामध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.कोणत्याही परिस्थितीत आत्ता वाहने सोडण्यात येणार नाहीत व फक्त अत्यावश्यक सेवा चालू असतील असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button