?️अमळनेर कट्टा…कळमसरे येथे सट्टा खेळणाऱ्यांवर धाड..!
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे सट्टा घेणाऱ्या एकावर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
सपोनि राहुल फुला यांना मिळालेल्या माहितीनुसार कळमसरे येथे बस स्टँड भागात पाण्याच्या टाकीजवळ रवींद्र भास्कर महाजन हा सट्टा घेत आहे.अशी माहिती मिळाली त्यानुसार ठिकाणावर गेले असता आरोपीला सट्टा घेताना पकडण्यात आले. त्याचे कडून ११३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ए एस आय बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.






