Amalner

?️ कोरोना अपडेट..पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात  चोख बंदोबस्त

?️ कोरोना अपडेट..पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त..

अमळनेर

गेल्या चार पाच दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 5 दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. ठिक ठिकाणी पोलीस तैनात असून चोख बंदोबस्त चौका चौकात ठेवण्यात आला आहे. विना कारण फिरणाऱ्या व्यक्तींना पिंजरा गाडीत दिवसभर ठेवण्यात येत आहे तसेच वाहने जप्त केली जात आहेत.अनेक व्यक्तींना उठा बशा घालण्याची शिक्षा देखील केली जात आहे.

एका गाडीवर तीन व्यक्ती,गाडीला नं नसणे,ड्रायव्हिंग लायसन्स नसणे इ च्या गाडीची हवा काढून टाकली जात आहे.विविध मार्गांनी लोकांनी विना कारण बाहेर पडू नये म्हणून अडविण्यात येत आहे.

?️ कोरोना अपडेट..पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात  चोख बंदोबस्त

चारचाकी,दुचाकी, सायकल चालक,पायी चालक इ ना सुभाष चौक,महाराणा प्रताप चौक,गलवाडे रोड, स्टेशन रोड,पैलाड इ ठिकाणी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बांधव कार्यरत आहेत.त्याच प्रमाणे ऑन ड्युटी आणि ऑफ ड्युटी सुट्टी वरील पोलीस कर्मचारी, सैन्य दलातील कर्मचारी देखील कार्यरत आहेत.मा पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button