खुले अमळनेर शहर त्यात रिकामटेकडेची भर कसे होणार कोरोनावर नियंत्रण
रजनीकांत पाटील
अमळनेर सध्याची कोरोना रुग्ण संख्या पाहता अंगावर काटा येतो व दिवसेंदिवस दिवस वाढती आकडेवारी पाहत चिंताजनक बाब आज ची ही स्थिती पाहता अजून पुढे कसे होणार याचा कोणी कधी विचार केला का
अमळनेर शहराचे आजचे चित्र पाहता सर्वी कडे गर्दी दिसून येत आहे काही बेजबाबदार नागरिक तोंडाला मास्क देखील लावत नाही तर काहींना सोशल डिस्टन्स चे पालन करणे म्हणजे दूरची गोष्ट आहे.
शहरात मोजके च लोक कामानिमित्त येतात मात्र जास्ती चे प्रमाण हे रिकामटेकडे च आहेत यांना कोणी विचारणार आहे की नाही का ?असेच चालत राहणार आता शहरातील कोरोना चे संकट आता ग्रामीन भागात शिरकावले आहे ते जर असेच वाढत गेले तर काय होणार ग्रामीण जनता ही दिवसभर शेतात राबनारी असते त्यांना देखील आता हंगामी लागवड,पेहरणीची चिंता त्यात कोरोना आजाराची धास्ती वाटू लागली.
कोरोनाची रुग्ण संख्या पाहता पुढे काय होईल याचा प्रशासनाने कधी विचार केला का? असे प्रश आता समाजातून बाहेर येत आहे.
अमळनेर शहरातील चित्र पाहता जणू अमळनेरकरांचा कोरोनाशी काही ही संबंध नाही असे दिसून यते आहे या बाबत प्रशासनाने शहरात गावात फिरणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी






