Kolhapur

करनूर मध्ये नुतन ग्रामपंचायत सदस्य सत्कार कार्यक्रम संपन्न

करनूर मध्ये नुतन ग्रामपंचायत सदस्य सत्कार कार्यक्रम संपन्न

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : (कागल) दत्त भजनी मंडळ, करनूर यांचेकडून नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा दत्त मंदिर ठिकाणी पार पडला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी माजी सरपंच भाऊसाहेब नलवडे होते.यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य प्रविण कांबळे, तानाजी भोसले, कुमार पाटील, रोनीत पाटील, कविता घाटगे,संगीता जगदाळे, उल्फत शेख, मंजिरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.वैभव आडके, विठ्ठल कांबळे,जयसिंग घाटगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रविण कांबळे मनोगतात म्हणाले आम्ही सर्व करनूर महाविकास आघाडी सदस्य आमचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या माध्यमातून गावात चेहरा मोहरा बदलू तसेच विरोधी सदस्यांना देखील विकास कामात सामावून घेवू. यावेळी माजी सरपंच इम्रान नायकवडी,बाळासो धनगर, बाळासो पाटील, युवराज शिंदे, राजमहमद शेख,समीर शेख, दिलीप खोत, लक्ष्मण गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमसाठी राजाराम भोसले, रावसाहेब चौगुले, महादेव पाटील, बावुराव ईश्वरा पाटील यांनी विशेष परीश्रम घेतला. प्रास्ताविक व स्वागत अरविंद चौगुले तर सुत्रसंचालन प्रकाश कदम आभार शंभू चव्हाण यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button