Amalner

⭕माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष स्व सुरेशशेठ ललवाणी यांना कुटुंबीय आणि ठोस प्रहार परिवाराकडून भावपूर्ण अभिवादन…

माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष स्व सुरेशशेठ ललवाणी यांना कुटुंबीय आणि ठोस प्रहार परिवाराकडून भावपूर्ण अभिवादन…

अमळनेर शहरातील माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष पाणी वाले बाबा म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होती..असे एक मनमिळाऊ, हसतमुख,कार्य तत्पर व्यक्तिमत्त्व, राजकीय नेता…स्व सुरेशशेठ ललवाणी यांचा आज स्मृतिदिन.. माझी आई सामाजिक कार्यात अग्रेसर होती आणि कुटुंब देखील राजकारणात सक्रिय असल्याने माझे आई वडील हे त्यांच्या चांगल्या संपर्कात होते.अनेक कामे करन्यासाठी आई त्यांच्या शी बोलत असे आणि माझाही त्या निमित्ताने परिचय झाला होता.सामाजिक कार्य करत असताना अनेक वेळा स्व सुरेशशेठ ललवाणी यांच्या शी संपर्क आला अनेक वेळा एका व्यासपीठावर बसण्याची संधी देखील मिळाली.पण नगराध्यक्ष पदाचा कोणताही गर्व नसलेली ही व्यक्ती कायम स्मरणात राहील. किती तरी कामे त्यांनी निव्वळ निरोप किंवा फोन वर केलेली आहेत.

खर तर काही व्यक्तिमत्त्व ही आपल्यात नसतानाही त्यांच्या चांगल्या व्यवहार,उत्कृष्ट कामगिरी,स्वभाव यामुळे कायम लक्षात राहतात.असेच एक अमळनेर शहराच्या जडणघडणीत ज्यांचे खूप भरीव कार्य आहे आणि त्यांच्या त्या कार्याची अमळनेर करांना जाणीव देखील आहे..असे स्व सुरेशशेठ ललवाणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठोस प्रहार च्या महाराष्ट्रातील सर्व परिवाकडून विनम्र अभिवादन..

त्याच प्रमाणे स्व सुरेशशेठ ललवाणी यांच्या परिवाराकडून देखील विनम्र अभिवादन…. त्यांची कमतरता नेहमीच भासेल….आज अत्यन्त भावपूर्ण वातावरणात सर्व कुटुंबीय त्यांचा वारसा अत्यन्त मेहनतीने आणि प्रामाणिक पणे चालवत आहेत.

⭕माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष स्व सुरेशशेठ ललवाणी यांना कुटुंबीय आणि ठोस प्रहार परिवाराकडून भावपूर्ण अभिवादन...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button