Parola

?️ पारोळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

?️ पारोळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १२ नातेवाईकांच्या संपर्कात सर्वाना तपासणीसाठी जळगांव येथे हलविले तर नातेवाईकांच्या संपर्कात आलेले ४२ जण पारोळा येथे सप्तर्षी मंगल कार्यालय मध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले. व जोगलखेडा गाव वस्ती सील केली.

जोगलखेडे येथील जावई पोलिसाला कोरोना पॉझिटिव, मालेगाव येथे पोलीस कर्मचारी असून ५४ जणांच्या संपर्कात आला आहे,
पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील जावई व नालबंदी तालुका भडगाव येथील रहिवासी तसेच मालेगाव येथे पोलिस असलेल्या एका 35 वर्षीय इसमास कोरोना चे लक्षण दिसून येत असल्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली होती.रिपोर्ट येण्याअगोदर त्याला सोडून देण्यात आले होते.

त्यानंतर तो जोगलखेडा येथे साखरवाडीच्या नातेवाईकांच्या अनेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह निकाल आल्यानंतर भडगाव व पारोळा तालुक्यात खळबळ माजली असून प्रशासन खळबळून जागे झाले असून कामाला लागले आहे. व पोलीस प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहे.आता तरी घराबाहेर पडू नका असे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button