Amalner

जळगाव जिल्ह्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांची सुरुवात: जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन

जळगाव जिल्ह्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांची सुरुवात: जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन..

प्रतिनिधी: महेंद्र साळुंके

एरंडोल येथे महात्मा फुले ब्रिगेडची जिल्हा कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न

अमळनेर:महात्मा फुले ब्रिगेडची जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठक एरंडोल येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन यांच्या नेतृत्वात व नाशिक विभागीय संपर्क प्रमुख डॉ धनराज देवरे यांचा अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली, बैठकीला सुरुवातीला पदाधिकारी परिचय, प्रतिमा पूजन, दिप प्रज्वलन ,मान्यवरांचा सत्कार सोहळा,प्रास्ताविक जिल्हा सचिव निलेश देवरे यांनी केले,जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले की महात्मा फुले ब्रिगेडतर्फे कार्यान्वीत होणाऱ्या योजना माहिती पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांना सांगितली
श्री संत सावता माळी पेन्शन योजना
(माळी समाजातील वयाेवृद्धांना वय 65 वर्ष पुढील)
सावित्रीआई फुले शिष्यवृत्ती योजना
(माळी समाजातील विद्यार्थी यांना 1 ली ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.)
महात्मा फुले स्वावलंबी याेजना
(या याेजनेच्या माध्यमातून शेती, व्यवसाय व उद्याेगासाठी अल्प व्याज दरात कर्ज)उपलब्ध करून देण्यात येईल, आपल्याला महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील माळी समाजाला आर्थिक दृष्ट्या,शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करायचा असून जास्तीत जास्त समाज बांधवांना आपल्या योजनांची माहिती द्या,प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय माळी यांच्या आदेशावरून आजपासून आपण जळगाव जिल्ह्यात योजनांची सुरुवात करत आहोत, यानंतर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शितल महाजन,जिल्हा संपर्क प्रमुख भिकन महाजन,विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, जिल्हा सचिव निलेश देवरे,डॉ.तुषार महाजन,यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
विभागीय संपर्क प्रमुख डॉ धनराज देवरे यांनी अध्यक्ष निय भाषणात महात्मा फुले ब्रिगेडविषयी व राबविण्यात येणाऱ्या योजनां विषयी सविस्तर माहिती दिली,व आपल्या योजना सर्व सामान्य समाज बांधवांनपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकाऱ्यांना करायचा आहे जेणेकरून आपला समाज बांधव योजनांपासून वंचित राहता कामा नये,यावेळी विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शितल महाजन,जिल्हा संपर्क प्रमुख भिकन महाजन,जिल्हा सचिव निलेश देवरे,जिल्हा कोषाध्यक्ष सचिन माळी,डॉ.तुषार महाजन(सिनियर मॅनेजर आदित्य बिरला सनलाईफ),एरंडोल शहरसंघटक कमलेश महाजन,एरंडोल शहर प्रसिद्धी प्रमुख गणेश महाजन,एरंडोल शहर कोषाध्यक्ष धीरज महाजन,ललित देवरे आदी उपस्थित होते,सूत्रसंचालन पियूष महाजन यांनी केले तर आभार निलेश देवरे यांनी मानले.माळी समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांनी महात्मा फुले ब्रिगेडच्या माध्यमातून सक्रिय व्हावे असे आवाहन महात्मा फुले ब्रिगेडतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button