? रक्षक च जेंव्हा बनतात भक्षक
अमळनेर येथील शिक्षण अधिकारी आणि चार पत्रकारांवर खंडणी चा गुन्हा दाखल….
अमळनेर येथील सदगुरु पब्लिक शाळेच्या चेअरमन श्री संजय व्यास यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात अमळनेर चे गट शिक्षण अधिकारी महाजन,पत्रकार जितू ठाकूर,महेंद्र रामोशे,मुन्ना शेख ,संजय पाटील व इतर दोन जण यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की चोपडाई कोंढावळ जवळ सदगुरू पब्लिक इंग्लिश मिडीयम ची शाळा अस्तित्वात आहे. या शाळेतील मुख्याध्यपिका यांनी वरील संबंधित अधिकारी आणि पत्रकारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सदर व्यक्ती सदगुरु शाळेत जाऊन नॅशनल पत्रकार आहोत असे सांगून दमदाटी आणि मुख्याध्यापिका यांना लज्जा उत्पन्न होईल अश्या भाषेत शिवीगाळ केली होती.
यासंदर्भात संस्थेचे चेअरमन संजय व्यास यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड संहिता नुसार कलम 384,504,506,34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमची बातमी वृत्तपत्रात छापू अशी धमकी देऊन 2,00,000/-रु ची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एव्हढे पैसे जवळ नसल्याने 25,000/-रु रोख रक्कम दिल्याचे नमूद केले आहे.
पोलीस तपास सब इन्स्पेक्टर गणेश बापू सूर्यवंशी हे करीत आहेत.






