नगरसेवक जावेद कुरेशी तर्फे शाळेतील सर्व मुलींना शालेय साहित्य वाटप करुन जागातिक महिला दिन साजरा
नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे
८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त बिलोली नगर परिषद शाळेत बिलोली न.प.चे नगरसेवक जावेद कुरेशी तर्फे सर्व शालेय मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, जागतिक महिला दिन निमित्त बिलोली नगर परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली .यावेळी बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे. केवळ तो निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे म्हटल्याने त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या उपेक्षित लोकसंख्या आहे. एवढे सांगितल्यास या दिवसाचे महत्त्व लक्षात येईल. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असूनसुध्दा उपेक्षित आहे. या महिलांना हा समाज संधीच देत नाही. त्यामुळे तिची तिच्या आत सूप्त राहिलेली कर्तबगारी ही अप्रकट राहते. मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो. ही खरी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करून दिले आहे. असे सखोल मार्गदर्शन तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी केले .
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे व समतादूत प्रकल्पाच्या मुख्य संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
यावेळी बिलोली न.प.चे नगरसेवक प्रतिनिधी अमजद चाऊस उपस्थित होते .व सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सहशिक्षिका सौ.नसीम बानू ,सौ.नजमा फातेमा व सहशिक्षक जाधव एस.एस.,जाधव पी.जी.यांनी परिश्रम घेतले शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.अजिझा बेगम यांनी आभार मानले






