Kolhapur

सुरुपलीतील त्या घटनास्थळी दिली भेट

सुरुपलीतील त्या घटनास्थळी दिली भेट

【ग्राहक हक्क संघर्ष समितीकडून नुकसान भरपाई मिळणे करिता करणार सर्वोत्तपरी प्रयत्न-मोहन गोखले जिल्हाध्यक्ष]

मुरगुड- तुकाराम पाटील

सुरुपली ता कागल येथे स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाच्या गॅस ने अचानक पेट घेऊन टाकीचा मोठा स्फोट झाला यात घरासह प्रापंचिक साहित्य रोख रक्कम सोने जळून खाक झाले यात दहा लाखांवर अधिक नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही .
ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या वतीने गॅस कंपनीचे ग्राहक म्हणून झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळणेकरिता समितीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन समितीचे जिल्हाध्यक्ष मोहन गोखले यांनी घटनास्थळी भेटी प्रसंगी केले.

ज्ञानदेव कृष्णा पाटील यांच्या पत्नी गॅसवर स्वयंपाक बनवत असताना अचानक गॅस ने पेट घेतला आणि क्षणार्धात मोठा स्फोट झाला फुटलेल्या टाकीचे तुकडे सुमारे शंभर फुटावर जाऊन पडले या स्फोटाने सर्व घर जळून खाक झाले प्रापंचिक साहित्याच पूर्णतः नुकसान झाले रोख रक्कम पंधरा हजार आणि 2 सोन्याच्या अंगठी जळून खाक झाल्या जवळपास यामध्ये दहा लाखावर अधिक नुकसान झाले आहे त्यांच्या कुटूंबावर आलेल्या भीषण संकटांला आपण सर्वाने मिळून मानसिक आर्थिक आधार द्यावा असेही मत मोहन गोखले यांनी व्यक्त केले प्रसंगी घटनास्थळी पाहणी करताना रावसाहेब यमगेकर ,ज्ञानदेव पाटील त्यांचे कुटूंबीय, तसेच गावचे सरपंच उपसरपंच, पो पा शिवाजी पाटील, पस कागल चे मा उपसभापती विजयराव भोसले, मुरगुड पोलीस स्टेशन च्या सहायक पोलीस निरीक्षण विद्या जाधव मॅडम यांनीही पाहणी करून पंचनामा केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button