? Big Breaking…झोपलेल्या प्रशासनाचा पुन्हा एकदा प्रत्यय …अमळनेर कोव्हीड केअर सेंटर मधून रुग्णाचे पलायन…
अमळनेर – येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटर मधून बापू निंबा वाणी नावाचा रुग्ण स्वब घेण्यापूर्वीच तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की याबाबत माहिती अशी की मंगेश दगडू वाणी यांच्यासह
त्यांची पत्नी व मुलगा याना 6 जुलै रोजी कोविड सेंटरला दाखल केले होते त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाअसून ते व मुलगा निगेटिव्ह आले होते म्हणून त्यांना घरी
सोडण्यात आले होते मात्र परिवारातील काका बापू निंबा वाणी हे कामा निमित्त बाहेर गेलेले होते म्हणून त्यांचा स्वब घेण्यात आला नव्हता पालिकेमधून त्यांना वारंवार काकांचा
स्वॅब घेण्यासाठी कोविड सेंटरला आणा म्हणून फोन येत होता म्हणून मंगेश वाणी यांनी 9 रोजी बापू वाणी याना कोविड सेंटरला दाखल करून त्याची नोंदणी केली व रूम नम्बर 68
मध्ये बसवून आले . 11 रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते आदल्या दिवसापासून शनिवार दुपारपासून गायब असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत मंगेश
वाणी यांनी विचारले असता तेथील लोकांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली आम्हाला माहीत नाही ते काम पोलीस प्रशासनाचे आहे.आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवू ? असे सांगण्यात आले.प्रशासन
उत्तरे नीट देत नसल्याने मंगेश वाणी यांनी माजी आमदार स्मिता वाघ यांच्या कडे तक्रार केली. या अनुषंगाने माजी आमदार स्मिता वाघ यांनी
प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले असून पोलीस बंदोबस्त असताना देखील या ठिकाणाहून व्यक्ती गायब कशी होते याचा जाब त्यांनी इनसिडन्ट कमांडर नात्याने उपविभागीय
अधिकारी श्रीमती सीमा अहिरे याना विचारला आहे.






