Latur

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आगळावेगळा वाढदिवस साजरा

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आगळावेगळा वाढदिवस साजरा

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- जगभरात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाचे संकट उदभवले असताना किल्लारी येथील उद्योजक श्री बिसरसिंग ठाकूर यांनी आपल्या मुलगा सौरभ याच्या वाढदिवसा निमित्त कोणताही अनावश्यक खर्च न करता मुलाचा वाढदिवस काही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले.
या दरम्यान सौरभ बिसरसिंग ठ‍ाकुर याच्या १६ व्या वाढदिवसानिमित्त देशासाठी कोरोना वर मात करण्यासाठी २४ तास तैनात असलेल्या कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना कोरोनाची लागण होवु नये किल्लारी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी पो.उप निरीक्षक अमोल गुंडे,पोहेका अनिल शिंदे, अडसुळे,मपोना मीरा जाधव, झोडपे, पत्रकार बाळापुरे सुर्यकांत, महेश उस्तुरे, कलीम शहा, विश्वनाथ गुंजोटे यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button